You are currently viewing ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले (९२) यांचे आज निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्‍या निधनाने संपूर्ण संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

वयाच्या ९२ व्या वर्षीही उत्साह कायम
वयाची नव्वदी ओलांडली असली तरी आशाताईंचा उत्साह आजही तरुणांना लाजवणारा होता. २०२३ मध्ये आपल्या ९० व्या वाढदिवसाला त्यांनी दुबईत तीन तासांचा लाईव्ह कॉन्सर्ट केला होता. त्या वेळी त्यांनी म्हटले होते की, “संगीत हाच माझा श्वास आहे. संगीतामुळेच मी कठीण प्रसंगांवर मात करू शकले.”आशा भोसले यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, २००० मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि २००८ मध्ये ‘पद्मविभूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा