You are currently viewing तेंडोली गावची सुकन्या क्रांती महेश प्रभु हिची साऊथ इंडियन टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड

तेंडोली गावची सुकन्या क्रांती महेश प्रभु हिची साऊथ इंडियन टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड

परूळे/ प्रतिनिधी :

कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावची सुकन्या क्रांती महेश प्रभु टेनिस क्रिकेट चॅॉम्पियनशिप हिची साऊथ एशियन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान नेपाळ येथे होणार आहे. क्रांती प्रभु एशियन २०२२ या स्पर्धेसाठी तिची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावची क्रांती ही रहिवासी असून नेपाल ( पोखरा ) या ठिकाणी स्पर्धा होणार आहे. प्रभु हिला सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेट सेक्रेटरी कुणाल हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर कोच भुषण गावकर, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट सेक्रेटरी मिनाक्षी गिरी याचे मार्गदर्शन लाभले आहे.  क्रांती प्रभु आपले शिक्षण पूर्ण करून संध्या तेंडोली गावातच राहत आहे. क्रांती ही यापूर्वी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धांमधून खेळली आहे. तिची टेनिस क्रिकेट स्पर्धेतील असलेली उपयुक्तता लक्षात घेऊन एशियन टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप क्रांती प्रभु हिला राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेदरम्यान गौरवितानाचा एक क्षण या भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

ही साऊथ एशियन २०२२ या स्पर्धेसाठी तिची टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत नेपाळ राज्यातील पोखरा या ठिकाणी होणार आहे.

साऊथ इंडियन टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झालेल्याबाबतचे पत्र टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कन्हैया गुर्जर यांनी क्रांती प्रभु हिला दिले आहे . दरम्यान भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या भारतीय संघात निवड झाल्याबद्दल क्रांती प्रभु हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा