You are currently viewing वेंगुर्ला येथे दी १२ एप्रिल रोजी भव्य “विशाल सकल हिंदू संमेलन” आयोजित

वेंगुर्ला येथे दी १२ एप्रिल रोजी भव्य “विशाल सकल हिंदू संमेलन” आयोजित

वेंगुर्ला येथे दी १२ एप्रिल रोजी भव्य “विशाल सकल हिंदू संमेलन” आयोजित

वेंगुर्ला :

सनातन हिंदू धर्म,भारतीय संस्कृती आणि समाजातील ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने “विशाल सकल हिंदू संमेलन” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनात समाजातील विविध घटकांना एकत्र आणून धर्म, संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत देश,धर्म आणि संस्कृतीसमोर उभ्या असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.या पार्श्वभूमीवर हे संमेलन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
हे संमेलन वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे रविवार,१२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७ वेळेत संपन्न होणार आहे.
या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून श्री.विवेक जोशी (प्रवचनकार, गोवा),महिला मार्गदर्शक म्हणून डॉ.वसुंधरा मोरे (आंतरराष्ट्रीय योग गुरु) आणि प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प.श्री.सावळाराम कुलकर्णी बुवा उपस्थित राहणार आहेत.
सर्व नागरिकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून या धर्मकार्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा