अंकिता वाडेकर व सुहास वाडेकर यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; मान्यवरांच्या हस्ते वितरण
देवगड / वाडा :
कोकणचे भाग्यविधाते व माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणरावजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य सौ. अंकिता सुहास वाडेकर व सुहास वाडेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरल, रामकृष्ण जुवाटकर, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, वाडा सरपंच सुनिल जाधव तसेच शक्ती केंद्रप्रमुख अविनाश सहस्त्रबुद्धे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला शशांक तावडे, सतिश परब, मनोहर परब, हर्षद जोशी, स्नेहल मिस्त्री, रवींद्र मांजरेकर, विवेक जाधव, काशिनाथ डोके, अभिजीत जाधव, योगेश परब, रामकृष्ण परब, आशिष जाधव यांसह ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
