*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*युद्ध नको…*
युद्ध नको हो युद्ध नको हवी पहा शांतता
माझी सत्ता माझी सत्ता विचार किती हा कोता
माणसकीला काळे फासले बळी किती घेतले
माणुसकीचा गळा कापूनी जग कसे जिंकले?
खच पडले हो प्रेतांचे तेथे लेकरे किती ती गेली
नेस्तनाबूत करून सारे करूणा तेथे मेली
काडी काडी जमवून माणूस कष्ट उपसतो किती
उद्धस्त करुनी दुनिया त्याची अशी कोणती नीति?
शस्रे आणि पैसा जमवून वेठीस जगाला धरती
खून पाडून इतके सारे वाटेना कशी ती भीती
तलवारीचा अंतच होतो तलवारीने सत्य
द्यावा लागतो हिशोब करता निंदनीय कृत्य..
तुझीच ना रे सारी लेकरे ही अशी निपजली
भ्रष्ट बुद्धी अशी कशी तू या दुष्टांना दिली
नको पाठवू “ पाजी” लोक तू धरती जगास वेठी
काय तुझ्या रे मनी न कळते तू असा कसा जगजेठी?
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
