११ एप्रिल रोजी उद्घाटन; आकर्षक बक्षिसांसह युवा मोर्चाकडून क्रीडावातावरणाला चालना
देवगड :
माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमहोस्तवी वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये “खासदार चषक” भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा, देवगड-जामसंडे शहर यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत स्थानिक क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंना आपली कौशल्ये दाखवण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी २०,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १०,००० रुपये, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी २,००० रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
आयोजकांकडून दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर व क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने करण्यात येत असून, देवगडमधील क्रीडावातावरणाला चालना देण्याचा उद्देश यामागे आहे.
