You are currently viewing आरोग्यम धनसंपदा
Oplus_16908288

आरोग्यम धनसंपदा

*ज्येष्ठ कवयित्री सौ कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आरोग्यम धनसंपदा* 

 

आरोग्यम धनसंपदा

करुया सूर्यनमस्कार

तंदुरुस्त राही शरीर

दुर होतील आजार

 

योग साधी ताळमेळ

शरीर आणी मनाचा

मिळे मार्ग आपल्याला

शांत जीवन प्रवासाचा

 

योगाने राखले जाते

सदा श्वासाचे संतुलन

राग आणी लोभाने

भरकटत नाही मन

 

भावनीक स्वास्थ्य

योग केल्याने लाभते

ताणतणावापासून

योगाने मुक्ती मिळते

 

अगणित असे फायदे

आहेत योग करण्याचे

अशा योगाला जीवनी

कधी नाही विसरायचे

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा