*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*खोटा सारा पसारा…!*
प्रत्येक प्रश्न
येथे राहतो अपूर्ण
करीत सुन्न
जीवास…!
अस्त्र मौनाचे
हल्ला कुठेच नसतो
श्वास कोंडतो
आत…!
फुलतो शहारा
मोडून काटा उरात
बोभाटा आत
दाबूनी…!
ओझ्यात प्राण
कित्येक विवंचनेत वाहतो
भार होतो
जडशीळ…!
दिखाव्यात वैभव
आत अंधार कोंडतो
पडदा फाटतो
तरीही…!
गूढ चिंतनाती
खोटा सारा पसारा
वाहतो मारा
प्रशंसनेचा…!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
