You are currently viewing जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत वामनराव महाडिक हायस्कूलचे सुयश

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत वामनराव महाडिक हायस्कूलचे सुयश

*जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत वामनराव महाडिक हायस्कूलचे सुयश*

*नवोदय परीक्षेत वामनराव महाडिक हायस्कूलचे चमकदार यश.*

*गौरंगी परब जिल्ह्यात चौथी; विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी.*

कणकवली

वामनराव महाडिक हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गौरंगी शैलेंद्र परब हिने जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवून प्रशालेची मान उंचावली आहे.
याचबरोबर स्वरा घोळवे, अदिती माने, सावली चाळके, रिद्धी कल्याणकर आणि रुंजी भोगले या विद्यार्थिनीही पात्र ठरल्या असून त्यांची दुसऱ्या फेरीत निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे गौरंगी शैलेंद्र परब हिची पहिल्याच फेरीत निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेच्या सहा.शिक्षिका आशा कानकेकर आणि सुचिता सुर्वे व पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे मुख्य कार्य. अधिकारी श्रीकृष्ण खटावकर,सर्व शाळा स.सदस्य,प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक,ग्रामस्थ तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनीही या यशाबद्दल विद्यार्थिनींचे व प्रशालेचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा