You are currently viewing कुडाळात नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन
Oplus_16908288

कुडाळात नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन

राज्यस्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा व जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा

पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित

कुडाळ :

कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी साजरा होत आहे. या सुवर्णमयी सोहळ्याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, कुडाळच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त गुरुवारी, ९ एप्रिल रोजी हळदाचे नेरूर येथील श्री देव जटाशंकर मंदिर येथे लघुरुद्र व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १० एप्रिल रोजी नेरूर येथील श्री कलेश्वर मंदिर येथे अभिषेक करून मुख्य कार्यक्रमांचा शुभारंभ होणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाप्रेमींसाठी दोन मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

राज्यस्तरीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने होणार असून, या स्पर्धेत ३०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबईसह बेळगाव आणि गोवा येथील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेत १०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.

बक्षिसांचा तपशील :

बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम ५ विजेत्यांना रोख रक्कम व चषक, तर पहिल्या ३० स्पर्धकांना रोख बक्षिसे व मेडल देण्यात येतील. सर्व खेळाडूंना टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात येणार असून ८ ते १७ वयोगटातील मुला-मुलींसाठी विशेष उत्तेजनार्थ बक्षिसे असतील.

कॅरम स्पर्धेत पहिल्या ४ क्रमांकांसाठी आकर्षक रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहेत.

वेळ व स्थळ :

या दोन्ही स्पर्धा शुक्रवार, १० एप्रिल रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत श्री महालक्ष्मी हॉल, कुडाळ (हॉल नं. १ व २) येथे पार पडतील.

नोंदणीसाठी संपर्क :

बुद्धिबळ स्पर्धा – श्रीकृष्ण ओडेलकर (९४२२३८१९४९)

कॅरम स्पर्धा – योगेश फणसळकर (७६२०७५५७६६)

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असून, या क्रीडा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा