You are currently viewing आमच्या कुटुंबातीलच सौ अर्चना बंगे पंचायत समितीवर निवडुन गेल्यामुळेच आम्हाला हक्काचे नेतृत्व मिळाले – – सुमन बंगे!

आमच्या कुटुंबातीलच सौ अर्चना बंगे पंचायत समितीवर निवडुन गेल्यामुळेच आम्हाला हक्काचे नेतृत्व मिळाले – – सुमन बंगे!

आमच्या कुटुंबातीलच सौ अर्चना बंगे पंचायत समितीवर निवडुन गेल्यामुळेच आम्हाला हक्काचे नेतृत्व मिळाले – – सुमन बंगे!

वालावल (प्रतिनिधी)

वालावल मुड्याचा कोन वाडी आजही दुर्लक्षीत राहीली मात्र आमच्या बंगे कुटुंबातीलच आमच्या सौ अर्चना बंगे पंचायत समितीवर निवडुन गेल्यामुळेच आम्हाला नेतृत्व मिळाले आहे असे गौरवोद्गार बंगे कुटुंबातील जेष्ठ श्री सुमन बंगे यांनी काढले
सौ बंगे या नेरुर देऊळवाडा दक्षिण मतदारसंघातुन निवडुन आल्याने त्यांचा सत्कार वालावल मुड्याचा कोन बंगे वाडी मधुन करण्यात आला,
यावेळी सर्वच उपस्थित बंगे बंधुंनी आपल्या वाडीच्या दुर्लक्ष झाला याचा पाढाच वाचला रस्ता नाही, पाण्याची व्यवस्था नाही, आमचे माऊली मंदीर सड्यावर स्थलांतर करुन पंचवीस वर्षे झाली शासनाने घरकुल योजना दीली पण आता ही घरे आता कोसळत आहेत तर दुरुस्तीसाठी निधी मिळत नाही, याच ठीकाणी जलजिवन अंतर्गत विहीर खोदून दोन वर्षे झाली तरी पाणी पिण्यासाठी व्यवस्था नाही, बंगेवाडीतुन डीलेव्हरी पेशंट जर आणायचा झाला तर डोळी करुन पेशंट नेत ग्रामस्थ नेत असतात असे सांगुन प्रत्येक निवडणुकित आश्वासने मिळतात ही निवडणूक झाली कि रस्ता करुया आणि रस्ता नाही झाला तर पुन्हा मते मागायला येणार नाही परंतु अशा किती निवडणुका पार पडल्या आम्ही कायमच दुर्लक्षीत राहीलो आहोत आता मात्र आम्हाला सौ अर्चना बंगे यांच्या रुपाने हक्काचे नेतृत्व मिळाले म्हणुनच आज बंगे कुटुंबाच्या वतीने सचिन बंगे, गोविंद बंगे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी जेष्ठ सुमन बंगे, गोविंद बंगे, निलेश बंगे, गोविंद पेडणेकर, गणेश बंगे, सचिन बंगे, भाई बंगे, विष्णू बंगे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा