You are currently viewing जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धेत मानसी ठाकूर हिने उत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला

जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धेत मानसी ठाकूर हिने उत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला

कणकवली :

 

जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा सिंधुदुर्ग खो खो असोसिएशनच्या वतीने पार पडली. या स्पर्धेत मानसी ठाकूर हिने उत्कृष्ट खेळाडू म्हणून मान पटकावला १८ वर्षांवरील खुल्या गटात या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण सात संघ यात सहभागी झाले होते. यामध्ये कणकवली कॉलेज कणकवलीने यश मिळविले आहे. या स्पर्धेत सात संघातील प्रत्येकी दोन खेळाडूंची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

कणकवली कॉलेज कणकवलीच्या मानसी ठाकूर, शोभा जाधव, साक्षी जाधव या विद्यार्थ्यांनींची निवड झाली आहे. कॉलेजच्या खो खो संघाला मालपेकर शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. कॉलेजच्या संघाचं आणि यशस्वी तिन्ही खेळाडूंचं कॉलेजच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग यांच्या वतीने देखील मानसी ठाकूर आणि तिच्या सहकारी खेळाडूंचे कौतुक करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − one =