You are currently viewing एमआयटी एडीटी तर्फे सागररत्न पुरस्कारांचे वितरण

एमआयटी एडीटी तर्फे सागररत्न पुरस्कारांचे वितरण

*एमआयटी एडीटी तर्फे सागररत्न पुरस्कारांचे वितरण*

पणजी, गोवा:

एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाची महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग(मॅनेट) आणि द नव्हेल कनेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बोगमॅलो बीच रिसाॅर्ट येथे आयोजित फ्यूचर स्किल्स मेरीटाइम (एफएसएम) आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सागर रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत, आमदार कॅप्टन वेंजी विगास, शिपिंगचे महासंचालक शाम जगन्नाथन, डाॅ.संकल्प शुक्ला, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, कॅप्टन प्रेरित मिश्रा, डाॅ.राजीव काशिकर, डाॅ.श्रीकांत गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.

सागरी क्षेत्रातील अलौकिक कार्याचे कौतुक करण्याच्या उद्देशाने मॅनेट या संस्थेतर्फे ‘सागर रत्न पुरस्कार’ ची स्थापना करण्यात आली. सागरी सुरक्षा, या क्षेत्रातील संशोधन आणि नावीन्य यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये कॅप्टन विपन तलवार(उद्योग क्षेत्र), कॅप्टन पंकज नायक, कॅप्टन चिन्ना रुपाजू आणि कॅप्टन कुणाल कात्याल (नेव्हीमधील भरती), कॅप्टन अंशुल राजवंशी(सीएसआर कार्य), कॅप्टन महेंद्र भसीन(सागरी सुरक्षा), कॅप्टन दिनेश जयराम, मनोज गांधी(सागरी उद्योग) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर कॅप्टन डॉ. शशांक जहागीरदार यांना ‘मेरीटाइम पर्सोना ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यासह सागरी क्षेत्रातील महिला सक्षमीकरणासाठी कॅप्टन करण कोचर यांना सन्मानित करण्यात आले.
तर सागरी क्षेत्रातील या महत्वपूर्ण कार्यक्रमाची सांगता कॅप्टन विपन तलवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून करण्यात आली.

*संवाद मिडिया*

*प्रवेश सुरू… प्रवेश सुरू …. प्रवेश सुरू….*

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे…*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.*

*एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न*

*BCA*

*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी.*

https://sanwadmedia.com/131264/
*कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.*

*अधिक माहितीसाठी :*

*7972997567 /9420274119*

*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा व पुढील गुगल फॉर्म भरावा:*

https://forms.gle/qJoXM6ZdL71FiMXm6

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131264/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − seventeen =