You are currently viewing सावंतवाडीत मोफत पोलीस व आर्मी भरती मार्गदर्शन शिबिर

सावंतवाडीत मोफत पोलीस व आर्मी भरती मार्गदर्शन शिबिर

सावंतवाडीत मोफत पोलीस व आर्मी भरती मार्गदर्शन शिबिर

६ ते १० एप्रिल दरम्यान महेंद्रा अकॅडमीचा उपक्रम; तज्ञ प्रशिक्षकांकडून ग्राउंड प्रॅक्टिस व लेक्चर, नावनोंदणी अनिवार्य

सावंतवाडी

सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या पोलीस व आर्मी भरतीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे महेंद्रा अकॅडमीच्या वतीने मोफत भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ६ ते १० एप्रिल या कालावधीत पार पडणार असून भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
या शिबिरामध्ये तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ग्राउंड प्रॅक्टिस तसेच लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन दिले जाणार आहे. शारीरिक चाचणीसाठी आवश्यक सराव, तसेच विविध विषयांवरील मार्गदर्शन याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
भरती प्रक्रियेत यश मिळवू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त इच्छुकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन महेंद्रा अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरासाठी नावनोंदणी अनिवार्य असून इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी 90226 86944 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा