वैभववाडीतील संजय सावंत यांची जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्षपदी निवड
राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस आय. वाय. शेख यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव
वैभववाडी :
सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सेक्रेटरी तसेच वैभववाडी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आणि मे. संजय मेडिकल स्टोअर्स, वैभववाडीचे प्रोप्रायटर श्री. संजय जी सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस श्री. आय. वाय. शेख यांनी संजय सावंत यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व्यापारी वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे नेतृत्व निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
