You are currently viewing शाळांना संगणकांचे वाटप; शिक्षण क्षेत्राला नवी चालना

शाळांना संगणकांचे वाटप; शिक्षण क्षेत्राला नवी चालना

शाळांना संगणकांचे वाटप; शिक्षण क्षेत्राला नवी चालना

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संगणक प्रदान

नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते आज शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी जि.प. प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ (भटवाडी) येथे संगणक प्रदान करण्यात आला. हा संगणक विधान परिषदेचे आमदार डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात आला.

या उपक्रमासाठी नगरसेविका श्रीमती दिपाली भालेकर व श्री दिलीप भालेकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शाळांना आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळण्यास मदत झाली आहे.

याचबरोबर जि.प. शाळा नंबर ६ भटवाडी, सावंतवाडी तसेच वि.स. खांडेकर विद्यालय, सावंतवाडी या दोन्ही शाळांना संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमावेळी शिक्षक, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा