You are currently viewing सुरक्षा रक्षकांचे आंदोलन अखेर चौथ्या दिवशी मागे..

सुरक्षा रक्षकांचे आंदोलन अखेर चौथ्या दिवशी मागे..

सिंधुदुर्गनगरी:

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती तर्फे २६ जानेवारी २०२१ पासून जिल्हा अधिकारी कार्यालय ओरोस येथे चालू असलेले ठिय्या आदोलन अखेर आज चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले.दुपारी बारावाजता साहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी आमदार वैभव नाईक राष्ट्रवादीचे नेते काका कुडाळकर यांच्या सह राज्य सुरक्षा एकता समितीची कामगार अधिकारी कार्यालय ओरोस येथे तब्बल अडीजतास चर्चा झाली.त्या मध्ये सुरक्षा रक्षकांचे सुरक्षा किट तात्काळ वाटण्याचा निर्णय घेण्यात आला .व बैठकी नंतर लगेच सुरक्षा किट वाटण्यात आले.तसेच पुढील आठवड्या पासून सिंधुदूर्ग मध्ये सुरक्षा रक्षकांचा एक लिपिक नेमन्यात येईल. असा साह्यक कामगार आयुक्त रत्नागिरी यांनी जाहीर केले. सुरक्षा रक्षकांना महीनाभरात ओळख पत्र वाटप करण्यात येतील.रजिस्टेशन नंबर नियुक्ती नुसार देण्याचे मान्य करण्यात आले.तर आमदार वैभव नाईक. व काका कुडाळकर यांनी थक्कीत पगार व नियमित पगार विषयी.मगळवारी संबंधित मंत्र्यांसोबत बैठक लावतो असे सांगितले.मंडळाने चार दिवसात मागील सर्व पगार पावत्या देतो व या पुढे दर महा देतो. असे सांगितले.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीने सुरक्षा रक्षक मंडळाने दिलेल्या वेळेत काम पूर्ण नकेल्यास या पेक्षा तिव्र आदोलन या नंतर छेडू असे सागितले व दुपार नंतर आदोलन मागे घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 8 =