*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”कपाटातील कप्पे”*
मनातील कप्प्यामुळेच जीवनात येते रंगत
कपाटातील कप्पे जगायला शिकवतातIIधृII
कपाटातील कप्पे आठवणींचे संग्रहालय
जीवनाचे वेळापत्रक शिकवणारे गुरु होत
आपल्या मनातही कप्पे सदैव असतातII1II
काही कप्प्यात असतो द्वेष जुनी दुःख प्रेम
काहीत असतात न बोललेली स्वप्न
अनेक लोकांना ठेवतात मनाच्या कप्प्यांतII2II
मनातल्या कप्प्याला स्वच्छ कराव नित्य
दुःख द्वेषाला दाराबाहेर काढावं नेमानं
कप्पे भरावे उत्साहाने आनंदानII3II
कप्पे नसते तर आयुष्यात झाला असता गोंधळ
कप्पे म्हणजे शिस्त संयम नियोजन
कपाटाचे कप्पे शिकविती सुव्यवस्थापनII4II
ठेवू नये अहं कलुशीत विचार कप्प्यांत
ठेवावा समायोचित विनोद सुसंवाद
सकारात्मक सुगंध ठेवावा सांभाळूनII5II
©️कवी.श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
