*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जय श्री राम*
राम नाम घेता मुखी
होतो ऊर्जेचा संचार
राम नाम घ्यावे मनी
शुद्ध होतात विचार
जय श्री राम नामात
अलौकिक भक्तिभाव
हिंदू धर्माचा चेहरा
राम नामाचा प्रभाव
मानू रामाचे आभार
मिळे जीवना आकार
सार नामाचे जाणुया
मिटे मनाचा अंधार
पाळू धर्माचे नियम
करू निती आचरण
अखंडित राम नामे
करू भजन कीर्तन
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक
