You are currently viewing दिव्यांगांना रोजगार व स्वावलंबी बनवण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेला उत्कृष्ट प्रतिसाद व यशस्वीपणे संपन्न

दिव्यांगांना रोजगार व स्वावलंबी बनवण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेला उत्कृष्ट प्रतिसाद व यशस्वीपणे संपन्न

*दिव्यांगांना रोजगार व स्वावलंबी बनवण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेला उत्कृष्ट प्रतिसाद व यशस्वीपणे संपन्न*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल संचलित सक्षम दिव्यांग प्रशिक्षण रोजगार व निवारा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिव्यांगांना रोजगार व स्वावलंबी बनवण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. ही कार्यशाळा दिनांक 12 मार्च ते 14 मार्च 2026 रोजी पार पडली.या कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक 12 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन मधुसूदन तळेकर यांच्या घरी करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी श्री माऊली बहुउद्देशीय विकास संस्था कोनाळकट्टाचे श्री.ठाकूर सर, मार्गदर्शक शिक्षक म्हणून लाभलेले सौ. शेट्ये मॅडम,साईकृपा बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचे अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर, साईकृपा संस्थेचे सहसचिव सुनील तांबे सर, साईकृपा संस्थेचे अध्यक्ष श्यामसुंदर लोट सर, सत्यवान राऊळ सर, राष्ट्रीय दृष्टीने महासंघाचे अध्यक्ष श्री बाबुराव गावडे, रंजना इंदुलकर सविता गावडे, साईकृपा संस्थेचे कर्मचारी सौ.प्रसन्ना शिर्के मॅडम विशाखा कासले,ललित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री ठाकूर सर यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला. त्यानंतर श्री ठाकूर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे श्री लोट सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व आपण स्वतः दिव्यांग असून कसे सक्षम आहोत व तुम्ही कसे सक्षम व्हायला पाहिजे, स्वतःच्या पायावर कसं उभा राहिला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर शेटये मॅडम यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व आजपासून तीन दिवस मी तुम्हाला मार्गदर्शक शिक्षक म्हणून येथे कार्यरत आहे असे सांगितले व प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी दिव्यांग बांधवांना फाईल बनवायला शिकवण्यात आले. व दिव्यांग बांधवांनी ते फाईल बनवण्याचे प्रयत्न केले व उत्कृष्ट अशी फाईल बनवली.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी दिव्यांग बांधवांना प्रेझेंट पॉकेट शिकवण्यात आले.
प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी दिव्यांग बांधवांना करवंटी पासून वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू शिकवण्यात आले. तसेच कागदापासून कंदील शिकवण्यात आले. त्याचप्रमाणे साईकृपा संस्थेचे सभासद अंध दिव्यांग बांधव विजय कदम सर यांनी झाडू बनवायला शिकवली. व दिव्यांग बांधवांनी हे प्रशिक्षण खेळीमेळीने जतन केले व पार पाडले.
या कार्यशाळेत दिव्यांग व्यक्तींना विविध रोजगाराच्या संधी कौशल्य विकास तसेच स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला या उपक्रमामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रेरणा मिळाली. या कार्यशाळेमध्ये 35 हुन जास्त दिव्यांग सहभागी होते.
प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी
लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये चार नंबर काढण्यात आली एक नंबर रंजना इंदुलकर दोन नंबर मनीष दळवी तीन नंबर निलेश नाईक चार नंबर ललित गावडे या विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. दिव्यांग बांधवांनी या प्रशिक्षणाचा आनंद लुटला व यापुढेही आम्ही अशा प्रशिक्षणाला आवर्जून येऊ असे आश्वासन दिले. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. या तीन दिवसीय कार्यशाळेचे नाश्ता,जेवण व इतर खर्च संस्थेच्या वतीने करण्यात आला. व भोजन बनविण्यासाठी भक्ती सामंत, सविता गावडे व मंगेश गोसावी यांनी फार मोलाचे सहकार्य केले.तसेच भागीरथी शिंगाडे, शामु शिंगाडे,विठ्ठल शिंगाडे यांचेही संस्थेच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत.
ही कार्यशाळा तीन दिवसीय नसून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही कार्यशाळा पुढे अशीच कायम चालू राहणार आहे, असे साईकृपा संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे सर यांनी आवाहन केले.कार्यशाळेची सांगता साईकृपा संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांच्या निवासस्थानी झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा