**स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या कु. हिना सारंग या विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय ‘सिंधू रन’ स्पर्धेत उल्लेखनीय यश :**
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या कु. हिना सारंग या विद्यार्थिनीने दिनांक १५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित जिल्हास्तरीय ‘सिंधू रन’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत मिस हीना सारंग हिने १५ वर्षांखालील गटातील १० किमी धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकावून शाळेची मान उंचावली. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळा आणि पालकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हीनाच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, शिक्षकवृंद यांनी तिचे मनापासून अभिनंदन केले. तिच्या पालकांच्या पाठिंब्यामुळे व तिच्या मेहनत आणि जिद्दीमुळे हे यश तिने संपादन केल्यामुळे कु. हीना सारंग हीचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
