देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेकडून आंबा खरेदी-विक्रीचा शुभारंभ
देवगड
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने आज रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी कट्टा गोडावून येथे आंबा खरेदी-विक्रीचा रीतसर शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डी. बी. बलवान, संचालक जयवंत लाड, अभिषेक गोगटे आणि व्यवस्थापक संतोष पाटकर उपस्थित होते. या उपक्रमामुळे तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल हक्काच्या बाजारपेठेत विकण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
यावेळी बागायतदार गोकुळ आंबेरकर, श्रीजीत मराठे, प्रकाश डामरी, दिगंबर तोडणकर, संदीप तेली, रामचंद्र सावंत, राजा भुजबळ यांसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हंगामाच्या सुरुवातीलाच संस्थेने खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
