You are currently viewing वागदे टेंबवाडी येथे भीषण अपघात

वागदे टेंबवाडी येथे भीषण अपघात

वागदे टेंबवाडी येथे भीषण अपघात

एस-प्रेसो कारची रिक्षा टेम्पोला जोरदार धडक, चालक जखमी

कणकवली :

मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एस-प्रेसो कारने रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने वागदे टेंबवाडी येथे भीषण अपघात घडला. हा अपघात रविवारी (१५ मार्च) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, भंगार व्यावसायिक कुमार सूर्यवंशी हे आपल्या ताब्यातील रिक्षा टेम्पो घेऊन कणकवलीहून कसालच्या दिशेने जात होते. त्यावेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या GA-03 Z-9608 क्रमांकाच्या एस-प्रेसो कारने वागदे टेंबवाडी येथे त्यांच्या रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की रिक्षा टेम्पोच्या चालकासमोरील काच फुटली. त्यातून कुमार सूर्यवंशी हे बाहेर फेकले जाऊन रस्त्यावर पडले. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात एस-प्रेसो कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षा टेम्पोचेही नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा