You are currently viewing लायन्स क्लब सावंतवाडी अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची सर्वानुमते निवड
Oplus_16908288

लायन्स क्लब सावंतवाडी अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची सर्वानुमते निवड

जिल्हा गव्हर्नर डॉ. वीरेंद्र जी. चिखले यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया उत्साहात

सावंतवाडी :

लायन्स क्लब सावंतवाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच जिल्हा गव्हर्नर डॉ. वीरेंद्र जी. चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. या निवडीत लायन्स क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी लायन सुधीर आडीवरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्यासोबतच इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्या.

या निवडीबद्दल जिल्हा गव्हर्नर डॉ. वीरेंद्र जी. चिखले यांनी नूतन कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन केले. आगामी काळात लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

या निवडीमुळे सुधीर आडीवरेकर यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सावंतवाडी परिसरात लायन्स क्लबच्या कार्याला नवी गती मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा