You are currently viewing वेंगुर्ल्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेषभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धा

वेंगुर्ल्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेषभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धा

*वेंगुर्ल्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेषभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धा*

वेंगुर्ला :

गुढीपाडवा व हिंदू नववर्ष स्वागताच्या निमित्ताने ‘हिंदुधर्माभिमानी’ वेंगुर्ला यांच्या वतीने तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वेषभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा *गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता श्री देव रामेश्वर मंदिर, वेंगुर्ला* येथे आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय इतिहास, संस्कृती तसेच संत परंपरेतील आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दोन गटांमध्ये होणार असून लहान गट (इयत्ता १ ली ते ५ वी) आणि मोठा गट (इयत्ता ६ वी ते १० वी) असा विभाग करण्यात आला आहे. लहान गटासाठी भारतीय इतिहास व संत परंपरेतील आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे, तर मोठ्या गटासाठी रामायण व महाभारतातील आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे हा विषय देण्यात आला आहे. सादरीकरण मराठी भाषेत करणे आवश्यक आहे.
लहान गटासाठी पारितोषिके –
प्रथम क्रमांक : रु. १५००, चषक व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक : रु. १०००, चषक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक : रु. ७५०, चषक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ (२) : रु. ५००, चषक व प्रमाणपत्र
या गटासाठी पारितोषिकांचे प्रायोजक श्री. मिलिंद पिंजाणी (गीता क्लॉथ स्टोअर्स) आहेत.
मोठा गटासाठी पारितोषिके –
प्रथम क्रमांक : रु. २०००, चषक व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक : रु. १५००, चषक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक : रु. १०००, चषक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ (२) : रु. ५००, चषक व प्रमाणपत्र
या गटासाठी पारितोषिकांचे प्रायोजक नगरसेविका श्रीमती गौरी मराठे आहेत. दोन्ही गटांतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या चषकांचे प्रायोजक श्री. अभिषेक वेंगुर्लेकर आहेत.
स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख १७ मार्च २०२६ असून प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी दोन मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांनी दुपारी २.४५ वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी शाळेचे ओळखपत्र किंवा शाळेचे शिफारसपत्र सोबत आणणे आवश्यक असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु नववर्ष स्वागत यात्रेचे संयोजक गिरीष गंगाधर फाटक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. *सचिन परुळकर (मो. ९४२१२३८०५३) व श्री. विनीत म. परब (मो. ८५३०९१५३०४)* यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा