*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ज्ञान ज्योत सावित्रीबाई फुले*
ज्ञानाची ज्योत पेटवणारी,
अंधाराशी लढणारी ती…
स्त्रीशिक्षणाची पहिली वाट
धैर्याने दाखवणारी ती…
चिखल-दगड सहन करूनही
पराभव तिने स्विकारला नाही,
अन्याय अत्याचाराच्या काळोखाला
ती कधीच घाबरली नाही.
हातात पुस्तक, मनात स्वप्न
समतेचा दीप उजळविला,
स्त्री-पुरुष समानतेचा
नवा मार्ग तिने दाखविला.
आजही तिच्या कार्यामुळे
ज्ञानाचा प्रकाश पसरतो,
सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाचा
प्रत्येकास अभिमान वाटतो.
वंदन तुझ्या त्यागाला,
वंदन तुझ्या कार्याला,
भारतरत्न सावित्रीबाई फुले
शत-शत नमन तुला.
✍️ *संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
