*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावित्रीबाई फुले*
मुलींची क्रांतीज्योती
सुंदर पहाट उजळली
सावित्रीबाईंनी दिली
लेखणी।।
झेलले प्रहार
अन्याय अत्याचार विरोध
केला बोध
स्रीशिक्षणाचा।।
पेलले वादळ
ज्योतिबा नावाचा झंझावात
उजळती वात
अनाथांची।।
अनिष्ट रुढी
बंड तिने पुकारले
रक्षण केले
अबलांचे।।
सेवाव्रती थोर
कविमनाची होती साऊ
गुणगान गाऊ
किती।।
आदर्श खरा
महिलांसाठी ती अभिमान
कतृत्व महान
स्मरते।।
〰️〰️〰️〰️〰️🙏🌹🙏
अरुणा दुद्दलवार@✒️
