*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ती*
ती रोज पहाटे उठते
पदर खोचून डबा बनवते
पोळी लाटताना मात्र
हळुच गालात हसते
मायेच्या भाजीत टाकते
प्रेमाचा मसाला नि
चटणी लोणची कोशिंबिरी
असतो हळुच दाबेला
कधी लाडू कधी शिरा
राखुन ठेवलेली मिठाई
डबा हातात देताना
सूचनांची असते घाई
गाडी हळु चालवा
अन् लवकर पण घरी या
सुचना पण करता करता
बाय बाय पण करून घ्या
खिडकीतुन बघताना
दिसेनासा होतो अन्
नवरा घरी येण्याचा
घड्याळ सुरु होतो
संध्याकाळी साजशृंगार
गळ्यात दिसते एकदानी
मनोमनी म्हणते कशी
मीचं त्यांची मनकी रानी
येता घरी लाजते नि
डबा रिकामा पाहते
अन् उद्याच्या भाजीची
काळजी सुरु होते
*शीला पाटील. चांदवड.*
