जागतिक महिला दिनानिमित्त
केंद्रात प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या सनदी अधिकारी डॉ. निधि पांडे
जागतिक महिला दिनानिमित्त काही महिला सनदी अधिकाऱ्यांचा परिचय करून देत आहोत. अमरावतीला विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. निधी पांडे आता केंद्रामध्ये प्रति नियुक्तीवर सनदीअधिकारी म्हणून गेलेल्या आहेत. एक शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे.
त्यांचा माझा परिचय अमरावतीला विभागीय आयुक्त कार्यालयात झाला. अमरावतीला येण्यापूर्वी त्या दिल्लीला महाराष्ट्र सदनच्या प्रमुख होत्या.
आमचे दरवर्षी मे महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर होते. त्या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी मी डॉ.निधी पांडे यांच्याकडे विभागीय आयुक्त कार्यालयात गेलो.
मी माझे व्हिजिटिंग कार्ड पाठविताच मॅडमनी मला ताबडतोब आतमध्ये बोलाविले. मी माझ्या मिशन आयएएसची पूर्ण माहिती त्यांना सांगितली .त्यांची माझी ही पहिलीच भेट होती. मी त्यांना रितसर पत्र द्यायला उभा राहिलो तशा मॅडम पण उभ्या राहिल्या व उभे राहूनच त्यांनी ते पत्र स्वीकारले. मला नवल वाटले. एक आयएएस ऑफिसर माझे पत्र स्वीकारण्यासाठी उभा राहतो हे मला वेगळे वाटले.मी जायला निघालो तेव्हा त्या दारापर्यंत मला सोडायला आल्या. त्यांच्या कार्यालयातील सगळे अधिकारी दचकून गेले. असा कोणताही विभागीय आयुक्त कोणालाही सोडायला दारापर्यंत येत नाही. पण मॅडम त्याला अपवाद आहेत.
शिबिराच्या काळात मी माझे सहकारी श्री मनोहर वासनकर यांना निधी पांडे मॅडम यांच्याकडे पाठविले आणि शिबिराला भेट देण्यासाठी स्मरण करून दिले. त्यांनी शिबिराचे स्थळ वेळ टिपून घेतली आणि श्री वासनकर यांना स्वतःचा मोबाईल नंबर दिला आणि सांगितले की मी शिबिराला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला नक्की येते. सर्वात महत्त्वाचे त्यांनी श्री वासनकर यांना स्वतःचा मोबाईल नंबर दिला. हे नमूद करण्यासारखे आहे.
कोणतेही काम ताबडतोब करण्याची मॅडमची हातोटी लक्षणीय आहे.
माझा प्रशांत भाग्यवंत नावाचा विद्यार्थी हा आय ए एस ची तयारी करीत आहे.
अकोला येथील रहिवासी आहे. अकोला महानगरपालिकेत त्याचे एक काम बरेच दिवसापासून पेंडिंग होते. मी मॅडमला सांगताच मॅडमनी लगेच अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन लावला आणि प्रशांत भाग्यवंत यांचे काम ताबडतोब करून द्यावे असे सांगितले. आणि त्याच दिवशी ते काम झाले. जे काम अनेक वर्षापासून पेंडिंग होते ते निधी पांडे मॅडम यांच्या शब्दामुळे एका दिवसात झाले.
माझा दुसरा आयएएस करणारा विद्यार्थी म्हणजे अंकित राणे. तो अमरावतीला आला. तेव्हा मी बाहेरगावी होतो. अंकित म्हणाला मला मॅडमला भेटावयाचे आहे. मॅडमला विचारले. मॅडम म्हणाल्या त्याला लगेच पाठवा. अंकितला आयएएस करण्यासाठी मार्गदर्शन पाहिजे होते. मॅडमनी स्वतः तर मार्गदर्शन केलेच पण त्याचबरोबर प्रोबेशनवर असणारे आयएएस अधिकारी यांना आपल्या केबिनमध्ये बोलाविले आणि अंकितला त्यांचा परिचय करून गेला. अंकित त्यांच्याबरोबर गेला व आयएएस बद्दल तयारी कशी करायची याची माहिती त्याने घेतली.
माझे मित्र डॉ. उल्हास संगवई यांना मॅडमची तारीख पाहिजे होती .त्यांचा एक कार्यक्रम होता. मी त्यांना घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात गेलो. मॅडमला भेटलो.मॅडमनी लगेच होकार दिला.
निधी पांडे मॅडम आमच्याकडे म्हणजे आमच्या अमरावती भागात फार कमी वेळ होत्या. परंतु त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला शिस्त लावली. आज कोणते काम करायचे त्याची यादी तयार व्हायची. उरलेले काम किंवा न झालेले काम दुसऱ्या दिवशी यादीत समाविष्ट केले जायचे. झाले की नाही त्याची शहानिशा मॅडम स्वतः करायच्या. त्यांच्या काळात विभागीय आयुक्त कार्यालय स्मार्ट झाले होते . मॅडमनी आपल्याबरोबरच आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन अमरावती विभागातील कामे लवकरात लवकर करण्यासाठी जो पुढाकार घेतला तो नोंदणीय आहे.
मध्यंतरी मॅडमच्या वडिलांच्या वाढदिवस होता. मॅडम नियोजित कार्यक्रमाप्रमाणे लखनऊला जाणार होत्या. पण राज्यपालांचा दौरा आला. मॅडम जाऊ शकत नव्हत्या. ही व्यथा त्यांनी मला बोलून दाखविली. मी त्यांना म्हणालो मी माझा प्रतिनिधी पाठवितो. मी माझ्या लखनऊच्या मित्रांना फोन केला आणि त्यांना मॅडमच्या वडिलांकडे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठविले. मॅडमचे वडील देखील आयएएस ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत .त्यांनी अतिशय शिस्त आणि शालिनता मॅडमच्या अंगी रुजवली आहे. त्यामुळे मॅडम प्रत्येक काम शिस्तीने करतात.
मॅडम अयोध्येला राम मंदिरात गेल्या. खरं म्हणजे आयएएस अधिकारी म्हटल्यानंतर काही औरच रुबाब असतो. पण अयोध्येला त्या राम मंदिरामध्ये दर्शनाच्या लाईनमध्ये उभ्या राहिल्या. मी आय ए एस ऑफिसर आहे. मला वेगळी वागणूक द्या. मला दर्शनाला लगेच घेऊन जा. असा कुठलाही आग्रह त्यांनी धरला नाही. एक आय ए एस ऑफिसर जेव्हा सर्वसामान्य माणसाप्रमाणे लाईन मध्ये उभा राहतो तेव्हा त्याच्या सामाजिक बांधिलकीची व माणुसकीची प्रचिती येते.
आज जागतिक महिला दिन सर्वत्र संपन्न होत आहे. विशेष म्हणजे मॅडमचा वाढदिवस देखील आठ मार्चलाच आहे. जागतिक महिला दिन व वाढदिवस एका दिवशी येणाऱ्या कदाचित ह्या एकमेव आयएएस अधिकारी असतील त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त व वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती
9890967003
