कणकवलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबीर’ कार्यक्रमाला उपस्थिती; कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटी घेणार
कणकवली :
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार, ७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.
नियोजित कार्यक्रमानुसार पालकमंत्री नितेश राणे यांचे दुपारी २.३० वाजता मुंबईहून मोपा विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून ते कणकवलीकडे प्रयाण करणार आहेत.
त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता कणकवली तहसीलदार कार्यालयात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराजस्व व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमानंतर ते ओम गणेश निवासस्थानी नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे कणकवली परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
