You are currently viewing आनंद लाड यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या केंद्रीय सचिवपदी निवड

आनंद लाड यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या केंद्रीय सचिवपदी निवड

आनंद लाड यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या केंद्रीय सचिवपदी निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार नेत्यावर राज्यस्तरीय जबाबदारी; कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या महावितरण केंद्रीय कार्यकारिणी सचिवपदी आनंद महादेव लाड यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे सहावे त्रैवार्षिक अधिवेशन दिनांक १ मार्च २०२६ रोजी पुणे येथे पार पडले. या अधिवेशनात राज्यभरातील पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
आनंद लाड यांनी २०१९ ते २०२५ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य केले. या काळात त्यांनी महावितरण मधील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा प्रामाणिक प्रयत्न व आंदोलने केली. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात यश आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका प्रामाणिक व अभ्यासू कामगार नेत्यावर राज्यस्तरीय जबाबदारी सोपविण्यात आल्याने जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे.
या पुढेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आनंद लाड यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा