You are currently viewing शिरवल क्रिकेट लिग स्पर्धेतुन भविष्यात ‌गुणवान खेळाडू घडतील – संदिप चौकेकर

शिरवल क्रिकेट लिग स्पर्धेतुन भविष्यात ‌गुणवान खेळाडू घडतील – संदिप चौकेकर

कणकवली

शिरवल गावातील खेळाडूना क्रिकेटचे एक चांगले व्यासपीठ मिळावे ,आणि गावातून चांगले खेळाडू तयार व्हावेत.यासाठी शिरवल क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन केले आहे.भविष्यात अशा क्रिकेट स्पर्धांमधून चांगले खेळाडू घडतील असा विश्वास प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक संदीप चौकेकर यांनी व्यक्त केला. या स्पर्धेच्या माध्यमातून “एक गाव’,एक संघ “या संकल्पनेतून ‌भविष्यात गावातील गुणवंत खेळाडूंना एकत्र करुन लिग स्पर्धेच्या संघाची बांधणी करण्यात येईल.हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे ते म्हणाले .

सिद्धिविनायक सेवा मंडळ शिरवल आयोजित आणि प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल, पुरस्कृत शिरवल प्रिमीयर लिग स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रथम विजेत्या बौद्धवाडी संघाला २०२२ रुपये आणि आकर्षक ‌चषक तर उपविजेता गाडेसखलवाडी संघाला १०२२ रुपये आणि आकर्षक चषक ‌ प्राणजीवन संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या हस्ते देण्यात आले. ‌

यावेळी व्यासपीठावर दत्ताराम पेंडूरकर, माजी सरपंच मनोज राणे, दिगंबर पांचाळ, भाई पार्सेकर, ग्रा.पं.सदस्य पांडुरंग गुरव, राजेश शिरवलकर,अनिप सावंत, श्रीकृष्ण यादव, प्रवीण तांबे, मंगेश शिरवलकर,पांडुरंग राणे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना संदिप चौकेकर म्हणाले कि, खेळ म्हटला, की जय-पराजय, यश-अपयश आलेच. मग यशाने हुरळून जाऊ नका नि पराजयाने खचून जाऊ नका, खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती जपा.क्रिकेट खेळामुळे चपळता, काटकपणा व शिस्तप्रियता या गुणांचा विकास होतो.असेही‌ ते म्हणाले.

या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते तसेच खेळामुळे मनाची एकाग्रता वाढते. खिलाडूवृत्ती वाढते.असेही चौकेकर यांनी सांगितले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राणजीवन सहयोग संस्था आणि सिद्धिविनायक सेवा मंडळ,खासकिलवाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा