You are currently viewing मायबोली

मायबोली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

मायबोली

रसिक मनाची माय मराठी मला आवडे भारी
अभंग ओवी अंगाई ती लडिवाळ गोड न्यारी

एका शब्दी अर्थ किती ते वाचता नवल वाटे
पिण्यास पाणी पाणी ग्रहणी कर घे करात गाते

काना मात्रा वेलांटी अन् अनुस्वारही
दिधले
माता माती तीच अक्षरे परी भावार्थ बदले

किती गम्मती या भाषेच्या अभ्यासाने कळते
बोली माझी माय मराठी वळवाल तशी वळते

मोरोपंती रचली आर्या तुका सांगती
गाथा
अमृत बोधी रामदास ते सहज टेकतो माथा

वासू येतो दारी त्याचे भारूड किती
रंगे
पोवाड्याची शब्द गर्जना होते डफली
संगे

भूपाळी ती या भाषेची अन् शृंगारे
नटली
फडी लावणी नवरस कवने शब्दसुमनात सजली

समृद्ध किती संपन्न किती गोडवा तिचा भारी
रसिक मनाची माय मराठी मला आवडे भारी

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा