You are currently viewing पोलीस …! साहेब….! (FATHER’S DAY निमित्त लिहिलेली रचना )

पोलीस …! साहेब….! (FATHER’S DAY निमित्त लिहिलेली रचना )

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पोलीस …! साहेब….!*
(FATHER’S DAY निमित्त लिहिलेली रचना )

अधून मधून मी माझ्या
बापाची टोपी घालून बघतो
त्यांच्यातला पोलीस
माझ्यात शिरतो ….!

त्या टोपीत
आमच सारं आयुष्य दडल होतं
वर्दी त्यांची आजही
जपून ठेवली ….
त्या वर्दीन आम्हांला झाकल होतं….!

ती वर्दी घामाने भीजली
रक्ताने माखली …जखमी झाली
संकटे.. झेलता झेलता मळली
वर्दीची ताकद होती
शान होती !किर्ती होती ….!!

पोलिसांनीच लहानाचे मोठे केले
बाबा नाव दिले
वर्दीने वाढवले!घडविले!
वर्दीचे संस्कार अंगात भिनले .!!

आज मी जो काही आहे
माझ्या बापाची काॅपी आहे
वर्दी अंगावर नसली जरी
रूबाब तोच आहे!साहेबी थाट आहे!

अभिमान मला !माझ्या बापाचा
माझा बाप पोलीस होता …..!!
आज माझा बाबा नाही!साहेब नाही
पण माझ्यातला पोलीस मला…
आजही सोडून गेला नाही ….!!

मी गेलो जरी…
त्या पोलीसाला !साहेबाला ..
जावू देणार नाही…….!!
त्या वर्दीला
डाग लागू
देणार नाही ……!!!!
आजही ओळख माझी
माझा बाप पोलीस होता….!!!
बाप..बाप होता..है..

बाबा ठाकूर धन्यवाद
माझे वडील आय.पी.एस.अधिकारी 37 वर्षांची त्यांची लोकसेवेची कारकीर्द!मध्यप्रदेश,काश्मीर,महाराष्ट्र व नागालॅंड उच्च पदावर कार्यरत होते.आज जो काही मी आहे माझ्या साहेबामुळेच. बाबांना आम्ही बालपणापासून साहेब म्हणायचो!बाबा नाव माझं मला सांभाळणा-या जपणा-या पोलीस स्टाफने दिले !दक्षता मासिकाने दिले !
माझं वैयक्तिक जगणं व व्यक्तिमत्त्व सर्व माझ्या साहेबांकडून आलेलं!याचं स्मृतिप्रीत्यर्थ ही रचना!Police Day
Father’s Day..In Memory..

_________________________
*संवाद मीडिया*

*रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे*

*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी* मध्ये *नर्सिंग* क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी

*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.*(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष *2026-2027*

🔸 *कोर्सचे नांव-

💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*

•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*

•Eligibility- 12th Pass Any Stream

• Duration : 3 Years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*

*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*
*संधी* –

🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*

*पत्ता:*
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612

*📞 संपर्क:*

*9960906947 / 9422620047*

कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204123/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा