You are currently viewing घारपी शाळेचा ७०वा वर्धापनदिन उद्या १मार्च रोजी उत्साहात साजरा होणार

घारपी शाळेचा ७०वा वर्धापनदिन उद्या १मार्च रोजी उत्साहात साजरा होणार

*घारपी शाळेचा ७०वा वर्धापनदिन उद्या १मार्च रोजी उत्साहात साजरा होणार*

*बांदा*
सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या घारपी गावचा अभिमान व ऐतिहासिक ठेवा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीचा ७०वा वर्धापनदिन उद्या रविवार दि. १ मार्च रोजी २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.
१मार्च १९५६ मध्ये रुजलेल्या या ज्ञानमंदिराने सात दशकांचा यशस्वी शैक्षणिक प्रवास पूर्ण केला असून, शेकडो विद्यार्थ्यांना घडविण्याचे महान कार्य केले आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त
माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, महिलांसाठी हळदीकुंकू, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थी , शिक्षक,माजी विद्यार्थी, पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर उपाध्यक्ष यशोदा गावडे मुख्याध्यापक जे.डी पाटील सहकारी शिक्षक,विद्यार्थी ग्रामस्थ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा