*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतचं..जगणं माझं..!!*
लेन्सपुढे.. हल्ली माझी
ओठांआड दमछाक होते
निसर्गाचं सहवास्तवं झाकतांना
प्रतिबिंबाना काळजी वाटते..
करिष्म्याकरता कॅमेराचं कासावीस
निसर्गाशी त्याचीचं घासाघीस
अरे..कितीकाळ मला जपणारं
हातचं राखून..बरचं मला दिलसं..
दृष्ट..कोणाची लागू नये
अजूनही..चेहरा माझा जपतोस
आईतर..कधीच सोडून गेली
गालावर तीट..तूच हसून लावतोस
आताश्या डोळ्यांत माझ्या
रोजचा..सूर्य उगवत नाही
कॅमेर्यासोबतचं जगणं माझं
सूर्याला तो..मावळू देत नाही..
फोटोज शेजारी फोटोचं जमले
घर सारे…एकत्र..झाले
माझ्या अश्राप..डोळ्यांना
आसवांचे ..हसू आले..!!
बाबा ठाकूर
