फोंडाघाटमध्ये ‘पोरे इलेक्ट्रॉनिक्स’चे उद्घाटन उत्साहात
फोंडाघाट:
फोंडाघाट येथे नव्याने सुरू झालेल्या ‘पोरे इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या हस्ते फित कापून उत्साहात करण्यात आले. उद्घाटनानंतर नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला तसेच गणेशपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अजित नाडकर्णी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना अजित नाडकर्णी यांनी दुकानाचे मालक राजू पोरे यांना शुभेच्छा देत, “पोरे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान दिवसेंदिवस प्रगतीपथावर जाऊन भरभराट होवो,” अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
