You are currently viewing दशावतार ही कला आता केवळ पुरुषांपुरती मर्यादित न राहता महिलांच्या सहभागाने अधिक व्यापक होत आहे – सौ.शितल दळवी

दशावतार ही कला आता केवळ पुरुषांपुरती मर्यादित न राहता महिलांच्या सहभागाने अधिक व्यापक होत आहे – सौ.शितल दळवी

*दशावतार ही कला आता केवळ पुरुषांपुरती मर्यादित न राहता महिलांच्या सहभागाने अधिक व्यापक होत आहे – सौ.शितल दळवी*

*सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ पावशी हे दशावतारातील महिला सहभागाचे उत्तम उदाहरण*

कणकवली (प्रतिनिधी)
दशावतार ही कला आता केवळ पुरुषांपुरती मर्यादित न राहता महिलांच्या सहभागाने अधिक व्यापक होत आहे.सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ पावशी येथील महिलांचा हा गट दशावतारातील महिला सहभागाचे उत्तम उदाहरण आहे.असे प्रतिपादन कळसुली जिल्हा परिषद सदस्या सौ.शितल दळवी यांनी केले.

त्या शिरवल रतांबेवाडी येथे रविवारी येथील आयोजित नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर कळसुली पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे,शिरवल सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रवीण तांबे, पोलिस पाटील सुशिल तांबे,डॉ.दिलीप घाडी,अमित दळवी,पुंडलिक कुडतरकर, दत्तात्रय प्रभूपाटकर, विजय कुडतरकर,अजित सावंत, पंढरी शिरवलकर, ग्रामपंचायत सदस्य सुचित गुरव,देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी संचालिका सौ. दीपश्री दत्तप्रसाद तवटे,
हार्मोनियम वादक – योगिता पवार, मृदूंगमणी – हेमंत तवटे, झाँज,वादक – काव्या पवार,नाट्यप्रेमी भाई पार्सेकर,अनिल कुडतरकर राजन सावंत, प्रवीण कोरगावकर,अमोल कोरगावकर,राजन शिरसाट आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना शितल दळवी म्हणाल्या की,शिरवल रतांबेवाडी येथील श्री.महापुरुष मित्र मंडळाने महिला दशावतारासारखे नाट्यप्रयोग शिरवल गावामध्ये आयोजित करुन महिला कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.खरच मंडळाचे उपक्रम स्तुत्य असून मंडळाचे काम कौतुकास्पद आहे.दशावतार क्षेत्रात माझ्या कलाकार मैत्रिणींनी आपली कला दाखविण्याचे धाडस केले.हे अभिमानास्पद आहे.मी श्री.सातेरी देवी महिला दशावतार नाट्य मंडळाचे अभिनंदन करते.

यावेळी कळसुली पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे म्हणाले की, दशावतार ही कला आता केवळ पुरुषांपुरती मर्यादित न रहाता महिलांच्या सहभागाने अधिक व्यापक होत आहे.त्यामुळे हि कला अधिक समृद्ध होत आहे.

शिरवल गावाने मला पंचायत समितीसाठी 85‌ टक्के मतदान करुन मला भरघोस मतांनी निवडून दिले.त्यामुळे आता माझी जबाबदारी वाढली आहे.श्री.महापुरुष मित्र मंडळ शिरवल रतांबेवाडीचे उपक्रम सर्वांनाच प्रेरणादायी आहेत .मंडळाला लागणारे सर्वोतोपरी सहकार्य आपले राहील.अशी ग्वाही लक्ष्मण गावडे यांनी दिली.

उपसरपंच प्रवीण तांबे म्हणाले की ,श्री.महापुरुष मित्र मंडळ शिरवल रतांबेवाडी हे स्व.शेखर शिरसाट यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत.स्व.शेखर शिरसाट यांचे सामाजिक कार्य पुढे नेण्याचे काम मंडळ करत आहे.

दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करुन कलेच्या आविष्काराची पर्वणी नाट्यरसिकांना हि मंडळी देत असून या मंडळाचे सामाजिक उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी जि.प.सदस्या सौ.शितल दळवी,पं.स.सदस्य लक्ष्मण गावडे, डॉ.दिलीप घाडी,
देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशीच्या संचालिका सौ.दीपश्री दत्तप्रसाद तवटे आणि नाट्य कलाकारांना शिवप्रतिमा आणि उपस्थित मान्यवरांना श्री.महापुरुष मित्र मंडळ शिरवल रतांबेवाडीच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी “भक्तांची पाठीराखी आदीमाया”नाट्य प्रयोग सादर करण्यात आला.यावेळी नाट्य कलाकारांनी नाटकातून धार्मिक, सामाजिक मनोरंजन आणि प्रबोधन केले.यावेळी नाट्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन नाटकाचा लाभ घेतला.कार्यक्रर्माचे सुत्रसंचलन विलास गोलतकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा