You are currently viewing बोर्डवे रेल्वे स्थानकासाठी २७ फेब्रुवारीला मध्यरात्री उपोषणाचा इशारा

बोर्डवे रेल्वे स्थानकासाठी २७ फेब्रुवारीला मध्यरात्री उपोषणाचा इशारा

बोर्डवे रेल्वे स्थानकासाठी २७ फेब्रुवारीला मध्यरात्री उपोषणाचा इशारा

चंद्रहास राणे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीचा निर्णय; प्रसंगी रेल रोको आंदोलन

कणकवली :

प्रस्थावित बोर्डवे रेल्वे स्थानकास मंजुरी मिळावी यासाठी गेली १५ ते २० वर्षे सातत्याने आंदोलने, निवेदने व पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने संघर्ष समितीने अखेर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी उपसरपंच चंद्रहास आत्माराम राणे (बबली) यांनी पोलीस निरीक्षक, कणकवली यांना दिलेल्या निवेदनात २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.०० वाजता बोर्डवे रेल्वे फाटक येथे उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
प्रशासन, संबंधित यंत्रणा तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे नाइलाजाने हा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास प्रसंगी ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा