*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ साहित्यिक वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ओढ*
〰️〰️〰️
अजूनही वाटते
तू भेटशील कधितरी
श्वास तुझ्यात गुंतलेला
गुणगुणतो अंतरी
ऋतुऋतुत गंधलेली
मन:प्रीत ही बावरी
ती निष्पाप निर्मली
ओढ झुळझुळणारी
सुखविते जीवाला
पावनी गंगौघापरी
आज फक्त प्रतीक्षा
अधिरतम हृदयांतरी
मनी तूच तूच तूच
नेत्री सांज पैलतीरी
तरीही आज वाटते
तू भेटशील कधीतरी
〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*
📞 *(9766544908)*
