You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यास गती; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यास गती; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पदभरती प्रक्रियेचा आढावा; प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्याचे निर्देश

राज्यातील पहिला AI युक्त जिल्हा म्हणून ओळख; विकासाचा वेग कायम राखण्यासाठी वरिष्ठ पदे तातडीने भरण्यावर भर

मुंबई :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय पदभरती प्रक्रिया तातडीने राबविण्याबाबत मंत्री श्री.नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली.

या बैठकीस वित्त विभागाचे अप्पर सचिव श्री.तानाजी पवार, कृषी विभागाचे श्री. चंदन शिवे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव श्री. सोमनाथ बागुल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे श्री. दीपक केंद्रे, महिला व बालविकास विभागाचे सहसचिव श्री.ठाकूर, जलसंधारण विभागाचे सचिव श्री.गणेश पाटील,जलसंधारण विभागाचे सहसचिव श्री.संदीप जाधव यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.नितेश राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा व राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणारा जिल्हा आहे. तसेच राज्यातील पहिला AI युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला ओळख मिळाली असून, नीती आयोगाने सिंधुदुर्गच्या AI मॉडेलची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्गमधील विविध आस्थापनांवरील वरिष्ठ व आवश्यक पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा