उमेद अभियान व RSETI चा जिल्हास्तरीय कौशल्य मेळावा संपन्न
सावंतवाडी
“स्वयंरोजगार उभारण्यासाठी वेगवेगळी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, त्यासाठी ची मोफत प्रशिक्षण व्यवस्था RSETI करते.” किशोर रोडी
RSETI संचालक
“कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती करण्यासाठी कौशल्य मेळावा आयोजित केला आहे.RSETI ची प्रशिक्षण माहिती देणे,लाभार्थ्यांची अपेक्षा समजून घेणे हा आजच्या मेळाव्याचा उद्देश आहे.”
नीलेश वालावलकर
जिल्हा व्यवस्थापक, उमेद अभियान
मागिरीश हॉल,सावंतवाडी येथे आज उमेद अभियान व RSETI च्या वतीने ‘कौशल्य मेळावा’ आयोजित केला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक RSETI संचालक श्री किशोर रोडी यांनी केले.प्रमुख मार्गदर्शक उमेद अभियान चे जिल्हा व्यवस्थापक श्री नीलेश वालावलकर यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. RSETI विषयी श्री कासले सर यांनी सादरीकरण केले .18 ते 50 वयोगटातील लाभार्थी, मोफत निवास व साहित्य, भोजन चहा,नाष्टा, शासन मान्य प्रमाणपत्र,2 वर्ष सहकार्य,उद्योजकता विकास, परिपूर्ण व्यावसायिक ज्ञान अशी विविध वैशिष्ट्ये त्यांनी मांडली.प्राची साळगावकर (फास्ट फूड उद्योजक) , नमिता शेगडे (शिवण काम) यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री पाटकर सर यांनी तर आभार प्रदर्शन उमेद चे प्रभाग समन्वयक श्री समीर ठाकूर यांनी केले.यावेळी वेंगुर्ला तालुका अभियान व्यवस्थापक श्री अमोल कावले, सावंतवाडी तालुका व्यवस्थापक श्री शिवानंद गवंडे, श्रीम. रिधिमा पाटकर, RSETI चे मास्टर स्कील ट्रेनर सेजल गावडे, सुस्मिता सावंत, साक्षी नाईक,श्री भालचंद्र मेस्त्री ,मूल्यांकन अधिकारी श्री. किरण पिंगुळकर, महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी श्री.पुरुषोत्तम पाटील व अर्पिता वाटवे मॅडम उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी सावंतवाडी,दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील युवक युवती व उमेद चे कर्मचारी व ग्रामसखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
