You are currently viewing जिजाऊ!हवाय एक शिवराय

जिजाऊ!हवाय एक शिवराय

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*जिजाऊ!हवाय एक शिवराय*

 

आज अनेक कार्यक्रमात, भाषणात किंवा प्रसंगात … “जय भवानी, … जय शिवाजी… “हा जयघोष होतोच‌

शिवरायांच्या आदर्शांचे कौतुक करणे, जाणता राजा म्हणणे, पराक्रमाचे गुणगान गाणे, शिस्त, कठोर कायदेपालन यांचे वारेमाप कौतुक केले जाते.काहीवेळा स्वार्थासाठी तर काहीवेळा समाज प्रबोधनासाठी परंतु केले जातेच.

हे शिवराय काही एका रात्रीत घडले नाहीत. शिवराय व‌ राजमाता जिजाऊ ही एक कठोर अशी शिस्त प्रणाली आहे. स्वप्न साकार करणारी दूरदृष्टी आहे. नियोजन व्यवस्थापन , हुकमत, जिव्हाळा, याची एकसंध सिस्टिम आहे.

स्वत:जिजाऊसाहेब या मोघलांच्या अत्याचाराने व्यथित झालेल्या, कर्तबगार, पती पासुन कोणाकडुनही मदत न मिळणारी अशी अगतिकझालेली होती . परंतु शांत न बसणारी आई शिवरायांच्या पाठीशी होती.

तिने स्वराज्याचे स्वप्न हिंदूंसाठी मनात जपले होते.

शहाजी राजे विजापूर दरबारी मनसबदार होते ते मोघलांविरूद्ध काही करायला तयार नव्हते. अशावेळी त्या आपल्या जहागीरीत पूण्यात आल्या. मोघलांनी पूणे बेचिराख करून ठेवले होते.शेते जमिनी जाषल्या पाणवठे नष्ट केले. रयत पळून गेली होती. पूण्यात स्मशानशांतता होती. दिवसा लांडगे कोल्हे फिरत. मग बेचैन राजमाता पूण्यात आल्या. शेतकरी गोळा केले. अर्थसहाय दिले. पाणवठे स्वच्छ केले, धान्याला भाव दिला . शेते होती तशी नांगरली शेतकरीवर्गाला व्यवसायी लोकांना धीर दिला. जातीने लक्ष घालून परत पूण्याचे रूप पालटले व प्रजेला परत राहायला त्यांच्या पाठीशी आपुलकीने ऊभ्या राहिल्या. शिवनेरी स्वत:साठी निवडले व देवी शिवाईला शरण गेल्या. पराक्रमी पूत्रासाठी नवस सायास, ऊपास तापास, पूजा पाठ केले.

शिवाई प्रसन्न झाली व शिवरायांसारखा पूत्र जन्माला आला. अखेरीस महाराष्ट्राच्या हाती सुवर्णक्षण लागला.भाग्य ऊदयास आले.

या पूत्रावर जिजाऊंनी खूप मेहनत घेतली. लहानपणीच रामायण, महाभारत, साधूसंत याविषयी गोष्टी सांगुन चांगले आदर्श, अन्यायाविरूद्ध चीड, साधूसंतांविषयी आदर, स्त्रीसन्मान, आदी गुण मनात रूजवले. मन समाजाभिमूख, संवेदनशील बनवले. लहान वयातच दादोजी कोंडदेव गूरू म्हणुन नेमून दांडपट्टा, तलवारबाजी, डोंगर राने वने यातुन घोडदौड, राज्यकारभार, न्यायदान, कायदे, शिस्त हे ही शिकवून तरबेज केले. बरोबरीचे खेळगडी मावळेच असत. त्याच्यात भेदभाव न‌ करता आपुलकीने वागायला शिकवले यामुळे मावळे राजांचा एकही शब्द खाली पडू देत नसत ऊलट जीवाला जीव देऊन असत. यातुनच लूटूपुटीच्या लढाया होत. असे शिवराय घडत गेले. यापाठी जिजाऊंचे फार मोठे प्रोत्साहन, मेहनत संस्कार आहेत. साधूसंतांनी समाजात जो भक्तीभाव, बंधूभाव, मराठीची जपणुक, वारकरी पंथाची स्थापना, भूतदया ह्याची भावना समाजात रूजवली होती त्यामुळे समाजाची घडी बदललेली होती ह्याचाही शिवरायांना फायदा झाला.जातीभेद, अन्याय, अंधश्रद्धा या विषयी चिड निर्माण झाली होती.नुसती शिवरायांवर भिस्त ठेवली नाही तर जिवनाच्या प्रत्येक अंगानी त्यांना घडवले होते.

बारा तेराव्या वर्षीच ते डोंगर ,गडकिल्ले, पायवाटा, चोरवाटा, करवंदाच्या जाळ्या, राने, टेहळणीच्या जागा गड चढणे ऊतरणे, मोक्याच्या जागा शोधणे इ. मधे तरबेज झाले. यातुनच दछर्लक्षित असा तोरणा किल्ला घेऊन त्यांनी स्वराज्याचे तोरण लावले.

आधीच मुसलमान अन्याय ,अत्याचार करतात त्यामुळे त्यांच्याविषयी संताप होताच .या संतापातुनच असे पाच सहा किल्ले त्यांनी घेतले. आता जिजाऊंचे स्वप्न साकार होणार असे दिसू लागले.

पण नुसते स्वराज्याचे स्वप्न बघणे,‌ते प्रत्यक्षात आणणे यावर ती दूरदृष्टी असणारी जाणती माता थांबणार नव्हती.

तिने गडकिल्ले घेणे, त्यांची डागडूजी करणे, संरक्षण व्यवस्था चोख ठेवणे, चार महिने पुरेल असा पाणी, अन्नधान्य साठा लढाईची शस्त्र, घोडेपागा, बुरूज यांची व्यवस्था सज्ज ठेवायला सांगितले.

बालकाला नुसता जन्मच नाही तर पराक्रमी , चारित्र्यसंपन्न, लढवैय्या, स्वराज्यसंरक्षण, प्रजेविषयी ममता, परस्त्रीची सुरक्षिततासन्मान, स्वभाषा, साधूसंत, विद्वान या विषयी आदर असा गुणसंपन्न घडवणे हे अतिशय अवघड कामही केले.हा सारा संघर्ष, अंगार, जिव्हाळा सदैव त्याच्या मनात जागृत धगधगता राहिल हे पाहिले.

१२जानेवारी हा राजमाता जिजाऊंचा स्मृतीदिन म्हणजे स्वराज्य ऊभारणीचा गौरव‌आहे. या स्वराज्याचे बीजच तिने पेरले.. जोपासले… वाढवले.. टिकवले.

यानंतर त्यांनी स्वराज्याला राजा हवा म्हणुन शिवरायांचा राज्याभिषेक करवून राजे छत्रपती झाले. त्यांच्यावर गोवंश, प्रजा, स्वराज्याची संपत्ती, गड बुरूज, मावळे, शेती, विहिरी यांचे रक्षण करण्याची जबाबदारीच टाकली.

यानंतर आपले स्वप्न आपल्या कर्तबगारीने पूर्ण करत देह ठेवला.

आता. छ. शिवरायांनी मिळालेल्या शिकवणूकीवरून पुढची कारकिर्द पार पाडली. स्वराज्यात धोका होऊ नये , मंदिरे नद्या, साधूसंत प्रजा स्त्रीया यांना धोका देणार्यांसाठी कठोर शासनाचे निर्णय घेतले, स्वैराचार अनाचार, भ्रष्टाचार, अनागोंदी, फंदफितूरी होऊ नये यासाठी कडक शिक्षा ठरवल्या,

ऊत्तम शासनासाठी अष्टप्रधानमंडळ स्थापन केले. गोरगरिब, शेतीच्या काडीलाही धक्का न लावणे, पशूधन यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासन ठरवले. देवळांना जमिनी, मदत, वर्षासने डागडूजी याची तजवीज केली. विहिरी खोदल्या. गडावर वेढा पडल्यास धान्यसाठा पाणी यांची सोय केली. कररचना करभरणी यावर जातीने लक्ष दिले. सारी संपत्ती लूटुन सुरतला मोघलांनी साठवली होती ती छ. शिवरायांनी लुटून आणली व स्वराज्यासाठी ऊपयोगात आणली.

आरमार ऊभारले

जलदूर्ग बांधले.

नुसतीच आखणी, अंमलबजावणी न करता वेष बदलून अनेक रूपात शिवराय सैन्याची परिक्षा घेत. कामचुकारांना शासन करत.

ही सारी स्वराज्याची घडण जडण यासाठी त्यांना जिजाऊंच्या विचारांची, शिकवणूकीची, खुपच मदत झाली.

त्यांनी हेच स्वप्न पाहिले व पूर्ण केले. केवळ मातृत्वाला महत्व न‌ देता….

लाड कौतुकाबरोबर संघर्षही शिकवला.स्वत: कठोर गुरू बनल्या.शिवरायांची प्रेरणाच बनल्या. कधीही चूकीला माफी, किंवा सौम्य भूमिका स्विकारली नाही. कठोर शिस्तपालन केले.

म्हणुनच छत्रपती शिवराय घडले. ते ही एकदाच. एकच अशी कर्तव्यकठोर राजमाता व ‘जाणता राजा’ही एकच होऊन गेला पण आज जवळ जवळ ४००वर्षानंतरही समाज त्यांना आदराचे स्थान‌ गौरवाने देतो.

आता समाजमन बदलले आहे. भ्रष्टाचार, अनाचार, अन्याय, स्वैराचार, स्त्रीवर अत्याचार, नैसर्गिक संपत्तीचा नाश , स्वधर्म, स्वभाषा, साधूमहंत, देवळे ‌परंपरा याविषयी फारच वाईट परिस्थिती आली आहे. शासनाची शिक्षांची भितीच ऊरली नाही.संवेदनाच नाहिशा झाल्यात.

कोणाचे कोणासाठी काही देणेघेणे नाही. फक्त आणि फक्त स्वार्थ, ऊरला आहे.

अशावेळी आठवण येते राजमातेची व छ. शिवरायांची.

तेच परत शिवशाहीचे रामराज्य आणू शकतील. ही मोघलाई नष्ट करू शकतील. असेच एक कठोर शासन व कडक शिक्षा परत अंमलात आणायला … आई जिजाऊ!… पुन्हा हवा एक छ. शिवराय आणि तुम्ही स्वत:. घडवा परत एक शिवराय.

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा