You are currently viewing शिशिर संपला

शिशिर संपला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शिशिर संपला*

(वृत्त:पादाकुलक)

———————–

 

उन्हे कोवळी भरास येता

कळ्या फुलांचा रंग बहरला

फुले पाखरे म्हणू लागली

शिशिर संपला शिशिर संपला

 

विरून गेले धुके ओलसर

दंवबिंदूंनी पाय काढला

नवी पालवी सांगत गेली

शिशिर संपला शिशिर संपला

 

मोहर फुलता आम्रतरुंवर

घमघम सारा फळास आला

पक्षांनाही अचूक कळले

शिशिर संपला शिशिर संपला

 

नवजननाची ओढ लागता

कोकिळ पक्षी सांगत गेला

पिल्लांसाठी घरटी बांधा

शिशिर संपला, शिशिर संपला

 

लांबत गेली सांज सावळी

चंद्र बिलोरी वयात आला

प्रेमविरांना निरोप कळला

शिशिर संपला शिशिर संपला

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

@ सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

प्रतिक्रिया व्यक्त करा