महाशिवरात्रीनिमित्त गणेशप्रसाद गवस यांचा सत्कार; पंचायत समितीत बिनविरोध निवडीबद्दल गौरव
दोडामार्ग
महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने तळकट मा ऊली मंदिर येथे देऊळवाडी ग्रामस्थांच्या वतीने कोलझर पंचायत समिती मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेल्या गणेशप्रसाद गवस यांचा सत्कार करण्यात आला.
हा सत्कार विवेकानंद सांवत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. ग्रामस्थांनी यावेळी आनंद व्यक्त करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी नीळकंठ सावंत, विष्णू घाडी, महादेव सावंत, अजित सावंत, गणपत शिरोडकर, गोविंद गवस, सिताराम सावंत तसेच कृष्णा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
महाशिवरात्रीच्या मंगलमय वातावरणात पार पडलेला हा सत्कार सोहळा देऊळवाडी ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद ठरला.

