You are currently viewing रामचरित सत्संग चा पहिला वर्धापनदिन साजरा 
Oplus_16908288

रामचरित सत्संग चा पहिला वर्धापनदिन साजरा 

यमुनानगर निगडी –

यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघात रामचरित सत्संग सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले. रामचरित सत्संग पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ह. भ. प. एकनाथ उगले यांना आमंत्रित करण्यात आले. श्री आप्पा कुलकर्णी यांनी त्यांचा परिचय करून दिला. ह. भ. प. एकनाथ उगले यांचे सत्संग या विषयावर सुश्राव्य असे प्रवचन झाले. प्रवचननंतर श्री चंद्रकांत सुर्वे यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात श्री चंद्रकांत सुर्वे श्री दत्तात्रय गुंजाळ श्री गजानन ढमाले श्री गोविंद खवासखान श्री आप्पा कुलकर्णी श्री शरद इनामदार श्री विजय पंडित श्री वसंत पांडे श्री नंदू सोनवणे श्री अशोक नहार श्री बाळासाहेब चव्हाण श्री रमेश कावळे श्री जयंत बरशेट्टी श्री संभाजी डोके श्री प्रदीप मुजुमदार श्री विलास रसाळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन श्री दत्तात्रय गुंजाळ, श्री चंद्रकांत सुर्वे, श्री गोविंद खवासखान यांनी केले. अल्पोहार व चहापानानंतर पसायदान होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा