You are currently viewing त्याशिवाय मी झोपणार नाही

त्याशिवाय मी झोपणार नाही

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*त्याशिवाय मी झोपणार नाही*

 

व्हॅलेंटाइन दिनाचा रुतला काटा

येऊन गेली छातीत कळ

हास्य चंद्र तो समोर येता

हसायच आल दुप्पट बळ…..1

हास्य धबधबा समोर दिसता

उरकून घेतले *स्नान त्वरीत*

लिहून पाठवले फक्कड काव्य

कस चुकवून चालेल जनहित. 2

सूर्य उगवला *जरी उशीरा*

कोंबडा देतो सुरेल *बांग*

जागी होते *कविता राणी*

पाडून कुरूळ्या केसांचा भांग..3

बिलगून छातीसी ऐकत बसतो

व्हॅलेंटाइन डे चा लाल गुलाब

परी न टोचतो *काटा हृदयी*

*फिदा होतो पाहून रूबाब*….4

अशीच रहा तू हंसत रोहीणी

नकोय मजला *दुसरे काही*

व्हॅलेंटाइनवर लिहीन कविता

त्याशिवाय मी झोपणार नाही …5

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा