You are currently viewing पंचाक्षरी
Oplus_16908288

पंचाक्षरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम भक्ती रचना*

 

पंचाक्षरी

नमोःशिवाय

 

सदा स्मरावे

सदाशिवाय

कर्पूरगौरा

नमोःशिवाय।।१

 

अधिष्ठित तू

कैलासावर

पार्वतीसह

भोळा शंकर।।२

 

पिनाक पाणी

त्रिशूल हाती

डमरू धून

सर्प साजती ।।3

 

बिल्वपत्रांनी

पिंड शोभते

शुभ्र सुमने

योगी भासते।।४

 

ध्यान मूर्ती ती

मनास मोही

अनन्य भक्ती

पावतो तोही।।५

 

रूप असे हे

सत्य शिवाचे

शिवरात्रीला

सुंदर साचे।।६

 

☘️🌷☘️🌷☘️🌷☘️

अरुणा दुद्दलवार✒️

दिग्रस यवतमाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा