You are currently viewing संदेश जीवनास

संदेश जीवनास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संदेश जीवनास*

(वृत्त~मंदारमाला)

 

कर्तव्यबुद्धीस सोडू नको रे तुझे काम तू चोखरीःत्या करी

निंदावया माणसे खूप आहेत ध्यानात ठेवी स्थिती ही बरी

 

जाशील जेथे तिथे भेटती टोचणारे जसे दर्भ रानीवनी

राहून काट्यांसवे त्याच तुम्हा पुढे जायचे गोष्ट ठेवी मनी

 

सोपे नसे गाठणे ध्येय साध्यासिध्या माणसा सत्य आहे असे

पाण्यात राहून माश्यासवे वैर नाही धरू हे कळावे कसे

 

खाईत गेला कितीदातरी धीर सोडावयाचाच नाही तुझा

नाहीच मानायची हार जिंकायचा एक बाणा

मनाशी तुझा

 

हा खेळ चाले जरी दुर्जनांचा तरी शेवटी जिंकते सत्य हे

आधार देण्यास तो बाप आहे अरे मानवा जाण तू नित्य हे

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा