You are currently viewing मारू मिठी

मारू मिठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मारू मिठी*

 

तुला पाहुन

तेजाळेल दिठी

प्रेमभराने

मारू मिठी

 

अहंकाराची

पुसू आठी

फुलवू आपली

संसार मठी

 

विश्वासाची

लावू उटी

पूर्वग्राहाच्या

नाजूक फटी

 

हळूच काढतो

दुरावा खिटी

वाजू लागेल

नवथर शिटी

 

सूर्य, चंद्र मग

येतील भेटी

ऐन उन्हाळी

चांदण पिठी

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा